मधुमेहाच्या तपासणीसाठी ‘कॉन्टॅक्ट लेन्स’
मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. आता शरीरातील शर्करेचं प्रमाण जाणणं सोपं होणार आहे. आणी हे काम करणार आहे एक कॉन्टॅक्ट लेन्स… विश्वास बसत नसेल ना! पण, हे खरं आहे.
नुकतीच वैज्ञानिकांनी एका कॉन्टॅक्ट लेन्सची निर्मिती केलीय जी आपल्या
शुगर लेव्हलची माहिती आपल्यापर्यंत पोहचवेल. आणि तेही आपल्या अश्रुंच्या
साहाय्यानं… त्यामुळेच लोकांना आता ‘शुगर लेव्हल’ तपासण्यासाठी प्रत्येक
वेळेस रक्त देण्याची गरज पडणार नाही.ओहियोमधल्या एकरान युनिव्हर्सिटीच्या एका टीममधल्या शोधकांचा दावा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या शरिरातील शर्करेचं प्रमाण कमी-जास्त प्रमाणात होत असेल तर लगेचच या कॉन्टॅक्ट लेन्सचा रंग बदलेल. त्यामुळे शरिरातील शर्करेच्या तपासणीसाठी ही कॉन्टॅक्ट लेन्स उपयोगी पडेल. टीमचे प्रमुख डॉ. जून हू सांगतात की, ही लेन्स केमिस्ट्री लॅबमधल्या पीएच पेपरसारखं काम करते. शर्करेच्या प्रमाणानुसार या लेन्सचा रंग बदलत जातो, तेही रक्ताशिवाय. त्यामुळेच या कॉन्टॅक्ट लेन्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकतात.
दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपची कमतरता…
बॉम्बे ब्लड ग्रुप हा मुंबईच नात सांगणारा ब्लड ग्रुप आहे. मुंबईच सौभाग्य म्हणा अथवा दुर्भाग्य बॉम्बे ब्लड ग्रुप जगात दुर्लभ आहे. या रक्तगटाच्या व्यक्तीचा अपघात झाला तर या ग्रुपच्या रूग्णांना रक्त मिळताना मुष्कील होत आहे. या बॉम्बे ब्लड ग्रुपची व्यक्ती कुठल्याही ब्लड ग्रुप रक्तदान करू शकते. मात्र दुसऱ्याच भल करणाऱ्या या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला इतरांच रक्त मॅच होत नसल्यामुळे रक्त संक्रमण शिबिरात चिंता व्यक्त केली जात आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप. मुंबईच नात सांगणारा ब्लड ग्रुप.
१९५२ मध्ये केईएम रूग्णालयात डॉक्टर व्हाय.एम.भेंडेनी या रक्तगटाचा शोध
लावला. जगात या ब्लड ग्रुपचे दुर्मिळ रक्तदाता आढळतात. देशात १०० बॉम्बे
ब्लड ग्रुपचे रक्तगटाच्या व्यक्तीचा शोध लागला आहे. यातील मुंबईतील सव्वा
कोटी लोकसंख्येत फक्त ५० जणच बॉम्बे ब्लड ग्रुपचे आहेत. या ५० जणात २०
रक्तदाता रक्तदान करण्यास आतापर्यंन्त पुढे आले आहेत. त्यामुळे एखादी
दुर्घटना घडली तर दुसऱ्याच भल करणाऱ्या या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला इतराच
रक्त मॅच होत नसल्यामुळे या ब्लड ग्रुपच्या जीव वाचवताना टेंशन येत असल्याच
खुद्द रक्तपेढीच्या संचालकानी मान्य केलं. बॉम्बे ब्लड ग्रुप हा आपला ब्लड
ग्रुप आहे.
याची ओळख पटल्यानंतर आपल्याला देवीशक्ती लाभल्याची जाणीव या रक्तदात्याना असली. तरी नेहमीच कामावर जाताना बॉम्बे ब्लड ग्रुपची व्यक्ती व्यायामासह हेल्थबाबत विशेष काळजी घेताना दिसते. बॉम्बे ब्लड ग्रुप इतका दुर्मिळ आहे की देश – विदेशातील रक्तदाता थिंक फाउन्डेशन रक्तपेढीकडे मागणी करतात. ज्यात पाकिस्तान, ढाका, चीन रक्तदात्याची मागणी अधिक आहे. हा ब्लड ग्रुप दुर्मिळ असल्यामुळे राज्य रक्त संक्रमण कौन्सिलन या व्यक्तीना विशेष मदत करावी अशी मागणी सामाजिक संस्थानी केली.
रॉक संगीत ऐकल्यामुळे येतो बहिरेपणा
जास्त जोरदार संगीत ऐकणं कानांसाठी अपायकारक असतं. नुकत्याच एका संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे. यासाठी एका संगीत कार्यक्रमात सहभागी झालेल्या किशोरवयीन मुलांचं निरीक्षण करण्यात आलं.
रॉक म्युझिक ऐकल्यामुळे ७२% मुलांच्या श्रवणशक्तीवर अनिष्ट परिणाम झाला
आणि त्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. हाऊस रीसर्च इंस्टिट्यूटचे
डॉक्टर एम. जेनेफर डेरेबरी आणि त्यांच्या ग्रुपने रॉक म्युझिकच्या
कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या किशोरवयीन मुलांची, ते कार्यक्रमासा
जाण्यापूर्वी आणि ते कार्यक्रमाहून आल्यावर चाचणी घेतली. यातून असा
निष्कर्ष काढण्यात आला की, कानठळ्या बसणारं रॉक म्युझिक ऐकल्यावर पुढील ४८
तास श्रवणशक्ती कमी होते. असं म्युझिक जर मुलं आय-पॅड, वॉकमन, सीडीमनद्वारे
कानामध्ये इयरफोन घालून ऐकत असतील, तर त्यांच्यात कायमस्वरुपी श्रवणदोष
निर्माण होऊ शकतो.ऑटोलॉजी अँड न्युरोटोलॉजी या नियतकालिकामध्ये या अभ्यासाबद्दल लिहिण्यात आलं होतं. काही किशोर वयीन मुलांना त्यांच्या आई-वडिलांबरोबर रॉक म्युझिकच्या कार्यक्रमाला बसवण्यात आलं होतं. त्यातील ३ मुलांच्या कानात इयर प्लग घातले होते. कार्यक्रमानंतर ५३.६ % मुलांनी मान्य केलं की त्यांना नीट ऐकू येईनासं झालं आहे. तर २५% मुलांना कानांत काही तरी वाजत असल्याचं वाटत राहिलं. या निरीक्षणावरून निष्कर्ष काढण्यात आलाय, की जास्त रॉक म्युझिक ऐकल्यास कानावर परिणाम होतो.
जास्त पाणी
पिण्याची 10 कारणे
पाणी पिणे तुमच्यासाठी का चांगले आहे आणि पाणी पिणे हा तुमच्या दिनचर्येचा एक भाग का असावा ह्यासाठी ही 10 कारणे दिलेली आहेत.
- आरोग्यमय त्वचा मिळवा
कायम राखण्यास देखील पाणी अत्यावश्यक आहे. यौवनाचा खरा झरा पाण्याच्या एका पेल्यातून मिळतो. तुमची त्वचा जास्त चांगली दिसावी ह्या करिता जास्त पाणी पिण्यासारखा उपाय नाही.
2. टॉक्सिन्स बाहेर फेका
शरीरातील, विशेषतः पचनसंस्थेतील, टॉक्सिन्स म्हणजेच विषारी तत्वे बाहेर फेकण्यासाठी, पाण्याची मदत होते. आपल्या किडनीची (मूत्रपिंडाची) गाळण्याची क्षमता अद्वितीय आहे आणि ह्या कामासाठी ही प्रणाली सर्वस्वी पाण्यावर अवलंबून आहे. वयोमानाप्रमाणे ह्याच्या कामांत कमतरता येत असते आणि म्हणून ह्याच्या कार्यक्षम चालनासाठी रोज पाणी पिणे अत्यावश्यक आहे. उच्च प्रथिनयुक्त आहार घेत असताना तर पाणी पिणे फार आवश्यक आहे कारण ह्यामुळे अतिरिक्त नायट्रोजन, यूरिया, आणि कीटोन्स बाहेर निघतात.
तुम्ही वजन वाढविण्यासाठी जास्त खात असाल तर मूत्रपिंडांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी तुम्हांला जास्त पाणी प्यावे लागेल.
3. ह्रदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करा
पांच पेल्यांपेक्षा जास्त पाणी पिणार्या लोकांना ह्रदयविकाराच्या झटक्याचा
किंवा ह्रदयरोगाचा धोका, जे लोक दररोज दोन पेल्यांपेक्षा कमी पाणी पितात
त्यांच्यापेक्षा कमी असतो असे कॅलिफोर्निया येथील लोमा लिंडा
युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी 20,000 पेक्षा जास्त निरोगी पुरूष व स्त्रियांचा
अभ्यास केल्यावर आढळले.
4. तुमच्या सांध्यांना व स्नायूंना नरम आधार आणि वंगण द्या
तुमच्या अस्थिसंधी आणि स्नायूंना नरम आधार आणि वंगण देणार्या द्रवपदार्थाचा पुष्कळसा भाग पाण्याने तयार होतो. आणि जरी ही एकच बाब स्नायू आखडण्याशी किंवा पेटके येण्याशी निगडित नसली तरीही ऍथलीट/खेळाडूंनी फार पूर्वीपासून हे अनुभवले आहे की सौम्य डीहायड्रेशनमुळे देखील पेटके येतात. म्हणून व्यायामाच्या आधी, व्यायामादरम्यान आणि त्यानंतर, पाणी पिण्याने स्नायू आखडणे पडणे/पेटके येणे आणि लवकर थकवा येणे ह्यापासून बचाव होतो.
5. उर्जा मिळवा आणि जागरूक राहा
साधारणपणे एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरातून दर दिवशी घाम, उच्छवास आणि मलमूत्रत्यागाच्या स्वरूपात 10 कप पाणी/द्रवपदार्थ बाहेर निघतो.
सौम्य डीहायड्रेशनमुळे देखील एकाग्रता न होणे, डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा
येऊ शकतो.
दररोज जास्त पाणी पिण्याने तुमची विचारशक्ती स्पष्ट होण्यास मदत मिळेल. संशोधकांनी वारंवार हे दाखवले आहे की मानवी मेंदूमध्ये 85 टक्के पाणी असल्यामुळे तो जलयुक्त असणे अत्यावश्यक आहे म्हणजे तो जास्तीत जास्त चांगल्या रीतीने काम करू शकेल. म्हणूनच देशातील पुष्कळशा शाळांमध्ये मुलांना पाण्याची बाटली बरोबर आणून पूर्ण दिवसभरात पाणी पिण्यास सांगितले जाते.
6. नियमित राहा
मलामध्ये कोलन व बल्क मिसळून बध्दकोष्ठापासून बचाव करण्यास पाणी मदत करते. एक साधा द्रव बध्दकोष्ठापासून बचाव करण्यात महत्वाची भूमिका वठवितो. द्रवपदार्थ फक्त मलाशयाच्या कामांतच मदत करीत नाहीत तर, मलास नरम देखील करतात.
योग्य पचन, पोषकद्रव्यांचे शोषण आणि रासायनिक क्रियांसाठी पाणी नितांत आवश्यक आहे. आपले शरीर जी कर्बोदके आणि प्रथिने आहार म्हणून वापरते त्यांची चयापचय प्रक्रिया आणि रक्तामध्ये रूपांतर होण्यास पाणी मदत करते. आणि तरीही आपल्या शरीरातून अनावश्यक पदार्थांचा निचरा करण्याच्या पाण्याच्या क्षमतेचे महत्व कमी होत नाही.
7. रोग आणि संसर्गाचा तुम्हाला असलेला धोका कमी करा
योग्य तेवढे पाणी न पिण्यामुळे पेशींचे असाध्य डीहायड्रेशन (निर्जलीकरण) होऊ शकते. शरीराच्या पेशींना आर्द्रता न मिळाल्याने त्या कमकुवत होतात आणि रोगांचे आक्रमण होण्याचा धोका वाढतो. ह्यामुळे संपूर्ण शरीराच्या एकंदर सुरक्षा तंत्रास कमकुवतपणा येऊन रासायनिक, पोषणाच्या दृष्टीने आणि असंतुलित पीएच मुळे शरीर रोगांना आमंत्रण देते.
जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा तुमच्या पेशी रक्तप्रणालीमधील पाणी घेऊ लागतात. तुमच्या ह्रदयास जास्त काम करावे लागताे कारण तुमचे रक्त घट्ट होऊ लागते आणि तुमचे शरीर महत्वाच्या इंद्रियांकडून रक्त दुसरीकडे पाठवू लागते. तुम्हांला खूप तहान लागण्याआधीच डीहायड्रेशन सुरू होऊ शकते. शरीरावर ह्यामुळे खूप जास्त ताण पडू शकतो कारण ह्यामुळे मूत्रपिंडांना त्यांच्या रक्त शुध्दीकरणाच्या महत्वपूर्ण कामात व्यत्यय येऊन विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकण्याच्या कार्यात अडथळे येतात.
तसेच मिशॉद आणि सहकार्यांनी 48,000 पुरूषांवर 10 वर्षे केलेल्या अभ्यासानंतर असे आढळून आले की जास्त द्रवपदार्थ पिणार्यांना कर्करोग होण्याची शक्यता उल्लेखनीय प्रमाणात कमी झाली. सहभागी झालेल्यांतील उच्च 20 टक्के रूग्णांनी 2500 मिली. किंवा त्यापेक्षा जास्तच पाणी प्यायले, तर निम्न 20 टक्के रूग्णांनी 1200 मिली. किंवा त्यापेक्षा कमी पाणी घेतले. संशोधकांना आढळले की ह्या मर्यादेमध्ये, प्रत्येक 240 मिली जास्त द्रवपदार्थ पिण्यामागे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका 7 टक्क्यांनी कमी झाला.
8. तुमच्या शरीराच्या तपमानाचे नियमन करा
आपल्या शरीराच्या शीतलीकरण प्रणालीचे नियमन पाणी करते. उच्च तपमानात केलेल्या दीर्घकाळ व्यायामाच्या दरम्यान किंवा नंतर खेळाडूंसाठीची खास पेये पिणे फारच लाभदायक ठरते. परंतु संयमित व्यायामासाठी शर्करायुक्त किंवा कर्बोदके असलेल्या पेयांपेक्षा पाणी जास्त चांगले असते असे बरेच विशेषज्ञ म्हणतात. तुमच्या शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यक असलेले पोषक तत्व म्हणजे पाणी होय.
प्रौढ व्यक्तीच्या शरीराच्या वजनामध्ये 55 ते 75 टक्के पाणी असते आणि शरीराच्या सर्व इंद्रियांचे व तपमानाचे नियमन करण्यात हे फार महत्वाचे असते.
9. चरबी कमी करा आणि स्नायू बळकट बनवा
डीहायड्रेशनमुळे प्रथिनांचे संश्लेषण कमी झाल्याचे आढळून आले आहे. प्रथिनांच्या संश्लेषणामधूनच स्नायू निर्माण होतात. मात्र ह्यासाठी खूप ऊर्जा लागते. प्रथिन-संश्लेषणाच्या क्रियेचे दमन केले गेल्यास थोड्याच कॅलरी प्रथिनांची निर्मिती करतात आणि जास्त कॅलरीजचे रूपांतर तुमच्या शरीरातील चरबीमध्ये होते.
जास्त पाणी पिण्याने तुम्हांला वजनावर नियंत्रण करण्यास मदत होऊन भूक व तहान या संवेदनांमधील तुमचा गोंधळ कमी होण्यास मदत मिळेल. चयापचय आणि पचनक्रियांसह, तुमच्या शरीरातील प्रणालींना व्यवस्थित कार्यरत ठेवून, व्यायामासाठी आवश्यक असलेली उर्जा (आणि आर्द्रता) पाण्यामुळे मिळते.
10. बरे व्हा
पाण्यामुळे तापाचे नियंत्रण होते, द्रवाची कमतरता दूर करता येते आणि कफ पातळ होतो. शरीराच्या बहुतेक सर्व क्रियाकर्मांमध्ये पाण्याची भूमिका फार महत्वाची आहे. दिवसा येणार्या थकव्याचे मुख्य कारण पाण्याची कमतरता हेदेखील असू शकते. शरीरातील पाणी 2 टक्के देखील कमी झाल्यास काही काळ आठवण राहात नाही, लहान-सहान हिशेबांमध्ये चुका होतात आणि संगणकाच्या पडद्यावर किंवा एखाद्या छापील पानावर एकाग्रता करता येत नाही.
पाणी हे जीवनतत्व आहे आणि पाण्याशिवाय जीवनच नाही. आपण आपल्या शरीरामध्ये ताजे पाणी सारखे भरत राहायला हवे म्हणजे त्यामध्ये योग्य प्रमाणात आर्द्रता राहील. डोकेदुखी, थकवा, संधिवात आणि आणखी बर्याच विकारांवर पाणी हा चमत्कार करणारा औषधोपचार आहे.
जेव्हा तुम्ही जास्तीचे शारीरिक श्रम कराल, तंतुयुक्त म्हणजे हाय फायबर आहार घेत असाल, गरम हवामानात तसेच उंच स्थळी असतांना, कोरड्या हवेच्या प्रदेशांत असतांना आणि आजारी असतांना - विशेषत: तुम्हांला ताप आलेला असेल, उलट्या होत असतील किंवा डायरिया झाला असेल - तेव्हा जास्त पाणी पीत राहा. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहांत की नाही हे पहाण्याचा उत्तम उपाय म्हणजे लघवीच्या रंगाकडे लक्ष ठेवणे. लघवीचा रंग अगदी फिक्कट पिवळा असायला हवा. रंग जर गर्द पिवळा असेल तर जास्त पाणी प्या. तुमच्या तहानेकडेही लक्ष असू द्या. एखाद्या दिवशी फारसे गरम होत नसेल तर तुम्हांला 8 पेले पाणी प्यायची गरज पडणार नाही.
जर तुम्ही व्यायाम करीत असाल किंवा हवामान फार गरम असेल तर तुम्हांला 9 किंवा 10 पेले पाणी प्यावेसे वाटेल. ह्यामागील मूळ तत्व काय? तर आपल्या शरीरात 90 टक्के पाणीच असते आणि पचनक्रिया, आरोग्यमय त्वचा, रक्ताभिसरण, तपमान नियंत्रण आणि इतर पुष्कळशा कारणांसाठी ह्याला पाण्याची गरज असते.
तुम्ही जागे असतांना दर तासाला एक पेला पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. आणि हे मनापासून करा. पुष्कळसे लोक त्यांना पाण्याची चव आवडत नसल्याची तक्रार करतात किंवा ते पिण्याचा कंटाळा येतो असेही म्हणतात! पाणी पिण्याची प्रक्रिया आवडावी ह्यासाठी ह्या टिप्सचा वापर करून पहा:
पाण्याच्या एखाद्या खुज्यात (किंवा सुरईत) लिंबू पिळा किंवा पाण्यात पुदिन्याची ताजी पाने, स्ट्रॉबेरी किंवा सफरचंदाच्या फोडी टाका. थंड करून द्या/घ्या. फ्रिजमध्ये नेहमीच एक ‘फ्रूट वॉटर’ पिचर ठेवा म्हणजे तुम्हांला नेहमी छानशा चवीचे पाणी मिळेल.
ग्लेशियू फ्रूट वॉटर घेवून पहा, ह्या डिस्टिल्ड पाण्यामध्ये फळांचा अर्क असतो, साखर नसते किंवा कृत्रिम गोडवा नसतो. बहुतेक हेल्थ फूड स्टोर्समध्ये हे उपलब्ध आहे. हे टरबूज, हनीड्यूमेलन, रासबेरी/लिंबू, स्ट्रॉबेरी/केळी यांसारख्या पुष्कळशा छान चवींमध्ये मिळते.
हर्बल म्हणजे वनस्पतींचा चहा प्या. हर्बल चहामध्ये वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात आणि हा पुष्कळ चवींमध्ये मिळतो - ग्रीन टी, यर्बा मॅट, चाय, चामोमाइल, मिंट, रासबेरी लीफ, आणि वेलदोडा/सफरचंद. उन्हाळ्यात तुम्ही हे सर्व बर्फ घालून सर्व्ह करू शकता. हिवाळ्यात, हे सर्व गरम प्यावे.
पाण्यात थोडे लिंबू पिळा. सकाळी रिकाम्या पोटी एका लिंबाचा रस टाकून कोमट पाणी प्यायल्याने लिव्हरमधील विषतत्वे/टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि ह्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळाल्याचे आढळले आहे.
पाणी प्या! शरीरात भरपूर पाणी असू
द्या! आरोग्यमय राहा!
थंडीसाठी
आरोग्य वर्धक युक्त्या
या वेळच्या थंडीत आहार,व्यायाम, इन्फ्लुएंझा, सर्दी आणि उदासीनता लक्षात ठेवा
सर्वांना फ्लू झालेला दिसत असताना आणि आरोग्यदायी कोशिंबिरी तसेच भरपूर
विटामिनयुक्त पदार्थ खाण्यातदेखील जास्त रुची वाटत नसताना आपण आपले आरोग्य
कसे राखू शकतो आणि हिवाळ्यातील रोगांपासून (एसएडी) स्वतःला कसे वाचवू
शकतो? आमच्या फक्त दहा युक्त्या आपल्याला वसंतऋतूपर्यंत आरोग्यदायी
राहण्यास मदत करतील.- आरोग्यदायी आहार घ्या. त्यात भरपूर प्रमाणात भाज्या आणि फळांचा समावेश करा. घरी बनवलेली भाज्याची सूप हिवाळ्यासाठी उत्तम आहेत. ह्यांमुळे पुरेशी जीवनसत्वे मिळून प्रतिकार शक्ति तर वाढतेच शिवाय यात भरपूर प्रमाणात ऑक्सिडंटरोधी द्रव्ये असतात जे मुक्त कणांमुळे (free radicals) शरीरावर होणार्या परिणामाचा प्रतिकार करतात हे सर्वांनाच माहीत आहे (हे काही प्रकारच्या कॅन्सरपासूनदेखील बचाव करतात). रोज आहारात पूरक जीवनसत्वे आणि खनिजे घेणे चांगलेच आहे, पण ते काही ताज्या अन्ना ऐवजी घेणे हितकारक नाही.
- चुकीच्या गोष्टी खाण्याने आपले वजन वाढत नाही ना यावर लक्ष द्या. चवीसाठी आबरगबर खाण्याची सवय हिवाळ्यात अधिक वाढते.
- नियमित व्यायाम करा – जरा थंडी पडली की स्वतःचे एका जागी बसलेले बुजगावणे करु नका. आपले गरम कपडे घाला आणि बाहेर पडा – किंवा घरातच काही खेळ खेळा किंवा नृत्यासारख्या एखाद्या कले मध्ये स्वतःला रमवा. आपण जर काही कारणास्तव बाहेर पडू शकत नसाल तर खिडक्या उघडून घरात स्वच्छ हवा येऊ द्या.
- चांगला आराम करा. जास्त थकण्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ति कमी होऊन आपल्याला रोगाची लागण होण्याचे धोके वाढतात.
- रोग झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा तो होऊ नये हे पाहणे जास्त महत्वाचे त्यामुळे आपल्या डॉक्टरांना विचारुन फ्लूविरोधी लस टोचून घ्या – या लसी फक्त मोठ्यांसाठीच नसतात. आपल्या सारख्या सशक्त माणसांना अशक्त करणारा इन्फ्लुएंझा हा व्हायरल म्हणजे विषाणूंमुळे येणारा ताप आहे. आपले कामाचे चिकार हजारो तास या इन्फ्लुएंझामुळे वाया जाऊ शकतात. फ्लूचे लसीकरण त्वरित करा त्यासाठी फ्लूचा हंगाम सुरु होण्याची वाट पाहू नका. फ्लूचे लसीकरण तुमचा सर्दीपासून बचाव करत नाही कारण सर्दी वेगळ्या विषाणूमुळे होते.
- जर आपल्याला साधे पडसे झाले असेल तर त्याचे कशात रुपांतर होण्याआधी त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. ताप व सर्दी घालविणारी बरीच औषधे मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध असतात. आपण वापरलेले रुमाल किंवा टिश्यू पेपर सरळ कचरापेटीत जाऊ द्या जेणे करुन हा विषाणू घरातील इतर सदस्यापर्यंत पोहोचणार नाही.
- सर्दी – पडशावर कोणत्याही प्रकारची ऍँटिबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके देण्याचा आग्रह करु नका किंवा ती घेऊ नका – अशा प्रकारचे रोग हे विषाणूंमुळे होतात आणि ते प्रतिजैविकांनी बरे होत नाहीत. प्रतिजैविके ही फक्त जीवाणुंच्या संक्रमणावर वापरली जातात. नको असतांना घेण्यात येणा-या प्रतिजैविकांमुळे औषधांना दाद न देणारे घातक जीवाणू वाढतात व रोगप्रतिकारक शक्ति आणखी कमी होते.
- हिवाळा आहे म्हणून घरात लपून बसू नका, खासकरुन जर तुम्ही कामासाठी बाहेर जात नसाल तर. प्रथम हे फार महत्वाचे वाटणार नाही पण यामुळे आपणाला एकटेपणा, मंदपणा आणि उदासीनता येते.
- हिवाळ्यातील उदासीनतेला पळवा. राष्ट्रीय मोसमी विकार संघटनेच्या मते (The National Organization for Seasonal Affective Disorder (एनओएसएडी) मोसमी विकार (एसएडी) हे काही उदासीनतेचे विकार आहेत जे दर हिवाळ्यातच मुख्यतः दिसतात. जर आपणाला वाटत असेल की आपल्याला एस.ए.डी. (मोसमी उदासीनता) होणार आहे तर थोड्यावेळासाठी दिवसाच्या प्रकाशात घराबाहेर पडा. जर शक्य असेल तर थंडीतील उन्हात जा.
जागरण करू नका, अन्यथा…
तुम्हाला कमी झोप असेल. तुम्ही कमी झोपत असाल तर.. अति जागरण करीत असाल तर तुमचे काही खरे नाही. किमान सहा तास व्यवस्थित झोप घेतली नाही तर तुमची कायमची झोप उडाली समजा. व्यवस्थित झोप घेतली नाही तर स्ट्रोकची लक्षणे मोठ्या संख्येने दिसून येतात.अमेरिकेतील बोस्टनच्या असोसिएटप्रोफेशनल स्लीप सोसायटीच्या २६ व्या वार्षिक बैठकीत या संशोधनाची माहिती देण्यात आली. या पाहाणीसाठी सर्वसामान्य उंचीच्या तसेच ज्यांच्यामध्ये स्ट्रोकची कोणतीही लक्षणे नाहीत अशा पाच हजारांपेक्षा जास्त लोकांची निवड करण्यात आली होती.
बॉडी इंडेक्स मास आणि झोपेबाबत संशोधन करणार्यांना असे दिसून आले की, जे मध्यमवयीन तसेच वृद्ध लोक रोज सहा तासांपेक्षा कमी वेळ झोपतात त्यांच्यामध्ये स्ट्रोकची लक्षणे मोठ्या संख्येने दिसून आली.
अधिक वजन असलेल्या लोकांवर झोपेचा काय परिणाम होते हे या संशोधनातून सांगितलेले नाही. मात्र, कमी झोप अनेक बाबतीत धोकादायक ठरू शकते हे निष्पन्न झाले आहे.
चार कप चहा प्या; मधुमेहाला दूर ठेवा
मधुमेहापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिवसातून कमीत कमी चार वेळा चहा प्या… असा सल्ला दिलाय ब्रिटेनच्या वैज्ञानिकांनी…मधुमेह आणि चहा या विषयावर अभ्यास करताना वैज्ञानिकांनी युरोपमधल्या चहा पिण्याची सवय असलेल्या १२ हजारांपेक्षा जास्त लोकांकडून माहिती जमा केली. यावर रोज चार कप चहा पिणाऱ्या लोकांना इतर लोकांपेक्षा मधुमेह होण्याचा धोका २० टक्क्यांनी कमी होता, असं त्यांच्या निदर्शनास आलं.
दररोज, १ ते ३ कप चहा पिणाऱ्या लोकांना हा धोका जास्त होता तर जास्त चहा पिणाऱ्या लोकांना हा धोका कमी असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला. पण, याचवेळी दूध आणि चहा पावडर असलेला चहा पिणं स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे, असंही या वैज्ञानिकांनी यावेळी नमूद केलंय.
सतत गोड खाल्ल्याने सुस्तावतो मेंदू
केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.केक, कुकी, जेली, जॅम आणि शीत पेयं यांसारक्या पदार्थांचं अतिसेवन केल्यास जेमतेम ६ आठवड्यांत वेडसर दिसायला लागतो. यावर संशोधन करणाऱ्या गोमेज पिनाला म्हणाले, “आमच्या अभ्यासातून लक्षात येतंय की आपण जे खातो, तसेच आपले विचार बनतात.”
‘लाईव्ह सायंस’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखात लिहिलं आहे की सतत गोड खाल्ल्याने मेंदू सुस्तावतो आणि त्याची स्मरणशक्ती कमी होत जाते. यावर उपाय म्हणजे आमेगा-३ फॅटी ऍसिड असणारं अन्न जेवल्यास हा धोका कमी होतो.
हवी असेल झिरो फिगर, झोपा ‘बेफिकर’
लठ्ठपणामुळे तुम्ही त्रस्त आहात आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हांला काही मार्ग सापडत नसेल तर झोपून जा….. हो आम्ही तुमची चेष्टा करीत नाही आहोत हे खरं आहे.
लंडनच्या वॉशिंग्टन युनिवर्सिटीने केलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर
आहेली आहे. २४ तासांपैकी ९ तास झोप घेतल्यास हळूहळू लठ्ठ व्यक्तीचे वजन कमी
होते. झोपण्याच्या सवयीने लठ्ठ होण्याच्या जीन्सवर विपरीत परिणाम होत
असल्याचे संशोधकांचे मत आहे.अभ्यासकर्त्यांनी केलेल्या संशोधनानुसार सात तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या व्यक्तीचे वजन खूप जास्त आहे. परंतु ज्या व्यक्ती नऊ तास किंवा त्यापेक्षाही अधिक झोपतात त्यांचे वजन कमी असते, असे द डेली टेलीग्राफने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर
एका नव्या संशोधनातून हे सिद्ध झालंय. याशिवाय पेशींना सेल्युलर डीएनए मध्ये परिवर्तित करण्यासाठीही डार्क चॉकलेट्सची मदत होते. कॅसरचा धोका कमी करण्यासाठीही डार्क चॉकलेट उपयोगी पडतं.या बाबतीत संशोधन करण्यासाठी अमेरिकेतील सॅन दिएगो युनिव्हर्सिटीत एक प्रयोग करण्यात आला. १५ दिवस एका पथकातील लोकांना ७०% कोको असणारी चॉकलेट्स खायला दिली. तर दुसऱ्या समुहाला व्हाइट चॉकलेट्स.
युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार कोको चॉकलेट खाणाऱ् पथकातील लोकांचमधील कॅलेस्ट्रॉल कमी झालं होतं. ग्लुकोजची मात्राही कमी झाली होती. शास्त्रज्ञांच्या मते डार्क चॉकलेट खाल्यामुळे लिपिड प्रोफाईल योग्य राहातं
रुग्णांसाठी संगीत आरोग्यदायी
शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना संगीत ऐकवल्याने शस्त्रक्रियेबाबतची भीती आणि ताण पळून जातो. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेनंतर प्रकृती वेगाने सुधारण्यासही मदत होते, असा दावा संशोधकांनी केला आहे. आगामी काळात संगीत हे शस्त्रक्रियेतील एक अविभाज्य घटक बनेल, असा विश्वास संशोधकांचा आहे. संगीताचे अनेक फायदे आतापर्यंत आपल्याला माहीत आहेत. उदास वाटत असल्यास संगीत ऐकल्याने मन आनंदी होते. ताणतणावापासून मुक्ती मिळते. त्यामुळे संशोधका्चा दाव्याला अधिक पुष्टी मिळत आहे.
ऑक्सफर्डमधील जॉन रॅडक्लिफ रुग्णालयातील पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. ज्यांना शस्त्रक्रियेसाठी अल्प प्रमाणात भूल देण्यात येते आणि जे शस्त्रक्रियेदरम्यान जागृत अवस्थेत असतात, अशा रुग्णांना संगीत ऐकवल्यास त्यांच्यामधील अस्वस्थता कमी होते. त्यामुळे त्यांचे मन शांत होते, असे संशोधकांना आढळून आले आहे. ही संगीताची खरी जादू आहे.
संशोधनासाठी लहान शस्त्रक्रिया होणा-या ९६ रुग्णांची संशोधकांच्या पथकाने निवड केली होती. शस्त्रक्रियेदरम्यान अर्ध्या रुग्णांना रेडिओवरून प्रक्षेपित होणारी किंवा शल्यविशारदांनी निवडलेल्या संगीताच्या सीडीज ऐकवण्यात आल्या तर अन्य अर्ध्या रुग्णांवर नेहमीच्या शांततापूर्ण वातावरणात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे या शस्त्रक्रियेदरम्यान सर्व रुग्ण अर्धजागृतावस्थेत होते. अपघातामुळे झालेल्या जखमा स्वच्छ करून त्यावर लहान शस्त्रक्रिया करणे आणि जखमेची जागा र्निजतूक करण्याचे उपचार या रुग्णांवर करण्यात येत होते. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेदरम्यान संगीत ऐकवण्यात आले होते. त्यांना कमी प्रमाणात अस्वस्थता जाणवत होती. तसेच त्यांच्या श्वसनाची गतीही इतरांपेक्षा कमी होती, असे संशोधकांना दिसून आले.
शस्त्रक्रियेच्यावेळी प्रत्येक रुग्णांवर थोड्याफार प्रमाणात ताण असतो. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना कोणताही ताण न येऊ नये, या दृष्टीने आमचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात, असे शल्यविशारदांनी सांगितले. हे संशोधन काही रुग्णांवरच करण्यात आले होते. या संशोधनामुळे शस्त्रक्रियेदरम्यान संगीत ऐकवल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात शस्त्रक्रियेदरम्यान संगीताचा वापर निश्चितच करण्यात येईल, असा विश्वास या संशोधनाचे प्रमुख डॉ. हाझीम सदिद्दीन यांनी व्यक्त केला आहे.
मासे आणि बदाम, देती कँसरपासून आराम
सिडनी युनिव्हर्सिटीच्या एका संशोधक पथकाने यावर अभ्यास केला. अभ्यासा अंती त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे, मासे आणि बदाम कँसर पसरण्यापासून बचाव करतात. शास्त्रज्ञ स्तनांचा कँसरच्या पेशींचे परीक्षण करत होते. यातील ओमेगा फॅटी अॅसिडची भूमिका तपासत होते.
“स्तनांचा कँसर हा जीवघेणा असतो आणि यावर अद्याप कोणताही उपचार सापडलेला नाही” असं या पथकाचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. मायकल मुरे यांनी सांगितलं. पण ओमेगा अॅसिड या कँसरला रोखण्यात सैनिकाची भूमिका बजावतं, असंही ते म्हणाले. टूना आणि सालमन या माशांमध्ये या अॅसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आहारात या माशांचा अधिक वापर करावा. पथकातील संशोधक याचा अभ्यास करत आहेत.
‘वृद्धांचे आरोग्याबरोबर राहणीमान सुधारणार’
जनतेच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि आयुर्मानवाढवं यासाठी ७ एप्रिलला जागतीक आरोग्य दिन साजरा केला जातो. यंदाचं ‘निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव’ हे यंदाच आरोग्य दिनाचं घोषवाक्य आहे. विशेषतं वृध्दांना सामाजिक सुरक्षा देणं, त्यांनी आनंदी जीवन जगावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
देशात आरोग्याच्या अपु-या सुविधा आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळत नाही. अंदाजपत्रकात आरोग्यासाठी ३ टक्क्यांपेक्षा अधिक तरतूद अपेक्षित आहे. यंदा अडीच टक्केच तरतुद करण्यात आलीय. ३०० नागरिकांमागे एक डॉक्टर असालया हवा पण भारतात १७०० नागरिकांमागे एक डॉक्टर आहे. हे प्रमाण पाहता देशातली आरोग्याची स्थिती लक्षात येईल. रोगावरील उपचारासाठी मोठा खर्च केला जातो. मात्र रोग प्रतिबंधकासाठी अधिक खर्च करण्याची गरज आहे. तर अनेक रोगांना प्रतिबंध करता येईल.
व्यायामानंतर कॉफी प्या, आणि कँसर टाळा
न्यू जर्सीमधील रुटगर्स अर्नेस्ट मारिओ स्कूल ऑफ फार्मसीच्या संशोधकांनी यासंदर्भात उंदरावर प्रयोग करुन पाहिले. यातून स्कीन ट्यूमरची शक्यता ६२ टक्क्यांनी कमी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ज्या जनावरांवर उपचार करून झाले, त्यांच्यामध्ये ट्यूमरची शक्यता ८५ टक्क्यांनी कमी झाल्याचं आढलून आलं.
या संशोधनातील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. याओ- पिंग लू यांनी सांगितलं, “व्यायाम आणि कॅफेन यांच्या संयोग उंदराना सूर्य किरणांमुळे होणाऱ्या कँसरचा धोका टळला. आम्हाला खात्री आहे, की भविष्यात या प्रयोगामुळे कँसरवरील उपचार होण्यास मदत मिळेल.”
कलिंगड ठेवते हृदय निरोगी
कलिंगड खल्ल्याने आपला उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते. फ्लोरिडातील एका अभ्यासातून काही निष्कर्ष निघाले आहेत. त्यातील हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. नैसर्गिक फळांच्या रसांमुळे चांगले रक्ताभिसरण होते. त्यामुळे आपल्याला रक्तदाबाचा त्रास होत नाही. कलिंगड खाल्याने ते आरोग्यासाठी चांगले आहे.
कलिंगडाचा रस हा उच्च रक्तदाब कमी करतो. त्यामुळे आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते. अभ्यास करणाऱ्या टीमने रसायन युक्त गोल्या एक आठवडा दिल्या. तसेच डमी उमेदवारांनाही त्याच गोळ्या देण्यात आल्या. त्यातून तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. जे कलिंगड खात होते, त्यांना धोका कमी असल्याचे स्पष्ट झाले. युकेमध्ये हृदयरोगाचे रूग्ण जास्त आढळून आले आहेत. याबाबतचा निष्कर्ष अमेरिकी जर्नलमध्ये प्रकाशित कऱण्यात आला आहे.
ऑफिसमधील चहा, कॉफी बनवतं आळशी
‘न्यूरोसाइकोफार्मकोलॉजी’ नावाच्या पुस्तिकेत प्रकाशित झालेल्या लेखात असं लिहीण्यात आलं आहे, की कॅफिनमुळे आळशी लोकांमध्ये तरतरी येत नाही. तरी काहींच्या मते एंफिटामाइनसारख्या उत्तेजक पदार्थामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो असं मानलं जातं, पण यामुळे मेहनती माणसं आळशी होण्याची ही शक्यता असते.
ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका दलाने हा प्रयोग करून पाहिला. यासाठी उंदरांचा वापर केला गेला होता. या प्रयोगाचे प्रमुख हॉसकिंग हे यासंदर्भात बोलताना म्हणाले, की यात चांगली गोष्ट एकच आहे की कॅफिनमुळे आळशी लोक कामचुकार होत नाहीत. पण, कॅफिनमुळे काम करण्याची इच्छा मात्र कमी होत जाते.
पेन किलर्समुळे वाढू शकतो ‘बीपी’
ग्रॉसमन यांनी ‘अमेरिकन जर्नल ऑप मेडिसीन’ यामध्ये काही औषधांचा उल्लेख केला आहे. गर्भनिरोधक गोळ्या, डिप्रेशन घालवणाऱ्या गोळ्या, बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या गोळ्या तसंच ऍसिडिटीवरील गोळ्यांचाही या गोळ्यांमध्ये समावेश होतो.
युनिव्हर्सिटीच्या मते अशा अनेक औषधांमुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा अतिरिक्त प्रभाव पडतो. बऱ्याचवेळा डॉक्टर्स ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर इलाज करताना ही गोष्ट ते सांगत नाहीत. या प्रकारची औषधं बऱ्याचवेळा डॉक्टरांची चिट्ठी न दाखवताही दिली जातात. त्यामुळे या औषधांमुळे काही धोका उद्भवू शकतो, ही गोष्ट फारशी कुणी मनावर घेत नाही. मात्र या प्रकारच्या गोळ्या बीपी वाढवू शकतात.
स्मरणशक्ती : योग्य आहाराची गरज
लहान मुलांसाठी दही आणि दुधाचे पदार्थ चांगले असतात. दही आणि दुध नियमित सेवन केले पाहिजे. कारण दही-दूध पोषक द्रव्ये आणि ‘ब’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहेत. तसेच ते मेंदूचे टिश्यूज, एंझाइम्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या विकासासाठी खूप गरजेचे आहे.सुका मेवा आणि सर्व प्रकारच्या बेरीजचे सेवन करावे. यामुळेसुद्धा मेंदूला खूप फायदा होतो.
लहान
मुलांनी ओट्स किंवा ओटमीलचे सेवन अवश्य करावे. कारण हे ‘ब, ई’ जीवनसत्त्व,
पोटॅशियम आणि झिंकचे उत्तम स्रोत आहेत. तसेच हे न्यूट्रिशन्स मेंदूच्या
उत्तम कार्यप्रणालीसाठी खूप आवश्यक आहेत. अंड्यांचेही सेवन करावे. कारण
अंडी पोषक द्रव्यांचे चांगले स्रोत आहेत. अंड्यातील पिवळ्या भागात असलेला
कोलाइन मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकतो. तर मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा चांगला
स्रोत आहेत. माशांच्या सेवनाने स्मरणशक्तीही वाढते. त्यामुळे मुलांना मासे
देणे तितकेच आवश्यक आहे.लहान मुलांची एकाग्रता वाढवणे, मेंदूची कार्यप्रणाली चांगली ठेवणे आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वरीप्रमाणे योग्य आहार देणे गरजेचा आहे. तज्ज्ञांच्या मते मानवी मेंदूचा भार शरीराच्या एकूण वजनाच्या केवळ दोन टक्के असतो; परंतु त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी भरपूर न्यूट्रिशन्सची आवश्यकता असते.
वयात होते वाढ, तशी झोप लागते गाढ
पेन्सिलव्हानिया युनिव्हर्सिटीच्या एका ग्रुपने १ लाख ५० हजार वयस्कर लोकांशी फोनवर संवाद साधून सर्व्हे केला. या सर्वेक्षणातून असं सिद्ध झालंय की वयाच्या चाळिशीनंतर बहुतेक लोकांची झोप वाढते. आणि अधिक गाढ झोप लागते.
स्लीप जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात सांगतलं गेलंय की वय वर्षं ८० पार केलेल्या लोकांनी मान्य केलं की त्यांना सगळ्यात चांगली झोप या वयात लागत आहे.
‘दही’ आरोग्यासाठी एकदम ‘सही’ !
आयुर्वेदाच्या मते, दह्यामुळे आरोग्य सुधारते. रोज दही खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उन्हाळ्यात दह्याचं ताक किंवा लस्सी प्यायल्यास पोटातील आग शांत होते. ताक पिऊन घराबाहेर पडल्यास ऊन्हाचा त्रास होत नाही. दह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्याने दह्यामुळे पचनक्षमता वाढते. दह्यात अजमोडा घालून प्यायल्यास बद्धकोष्टता नाहीशी होते.
रोज दही खाल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. तसंच सर्दी होत नाही. श्वासनलिकेला कुठलंही इन्फेक्शन होत नाही. अल्सरसारख्या आजारांमध्ये दही लाभदायक ठरते. तोंड आलं असल्यास दह्याच्या गुळण्या कराव्यात. यामुळे आलेलं तोंड बरं होतं. दह्यामध्ये मीठ, जीऱ्याची पुड, पुदीना घालून सेवन केल्यास अन्नपचनास मदत होते तसंच भूकही वाढते.
दूध प्या, स्मरणशक्ती वाढवा
नियमित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांची स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यप्रणाली दूध न पिणाऱ्यांपेक्षा अधिक सक्षम असल्याचे एका संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे.
बंगळूर
येथील एका विद्यापीठाने हे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी नऊशे
स्त्री-पुरुषांची निवड करण्यात आली होती. २३ ते ९८ वयोगटातील या नऊशे
जणांची मेंदूची चाचणी करण्यात आली. त्यात दृश्यपटल, मौखिक आणि स्मृती
चाचणीचा समावेश होता. त्याचवेळी त्यांच्या दूध पिण्याच्या सवयींवरही लक्ष
ठेवण्यात आले होते. या संशोधनाअंतर्गत घेतलेल्या चाचणीत दूध न पिणारे
तुलनेने पाच पट अयशस्वी ठरले आहेत.आठही स्तरांवरील चाचण्यात दूध पिणाऱ्यांनी अनियमित दूध पिणाऱ्यांपेक्षा चांगले गुण मिळविले आहेत. किंबहुना, दूध निरोगी आरोग्यासाठी लाभदायी आहे, असे या संशोधनातून समोर आले. जी व्यक्ती दिवसातून किमान एक ग्लास दूध पिते तिला त्याचा लाभ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेंदूशी संबंधित आठ स्तरांवरील कार्यप्रणाली अधिक चांगली असल्याचेही यातून दिसून आले आहे.
तुळस आजारांवरही रामबाण
तुळशीपासून बनविलेल्या औषधाची प्राथमिक चाचणी प्राण्यांवर करण्यात आली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात तुळशीपासून बनविलेल्या औषधाची आणखी चाचण्या करण्यात येतील व त्यांच्या यशस्वीतेनंतर या औषधाचे उत्पादन सुरू केले जाईल, अशी माहिती डीआरडीओच्या संशोधन व विकास विभागाचे मुख्य नियंत्रक डब्ल्यू. सेल्वामूतीर् यांनी दिली.
किरणोत्सार
बाधितांवरील उपचारासाठी पहिल्यांदाच तुळशीचा वापर करण्यात येत आहे.
किरणोत्साराच्या बाधेवरील सध्याची औषधे अत्यंत विषारी आहेत. मात्र
तुळशीसारख्या आयुवेर्दिक औषधामुळे या उपचारांतही सुरक्षितता येईल, असे ते
म्हणाले. सर्दीखोकल्यापासून अनेक नियमित आजारांवरचा रामबाण इलाज असलेली
आजीच्या बटव्यातली तुळस आता आधुनिक युगाने निर्माण केलेल्या आजारांवरही
रामबाण ठरत आहे. किरणोत्साराने बाधित झालेल्यांसाठी तुळस गुणकारी असल्याचे
सांगत डीआरडीओ तुळशीपासून खास औषध बनवलं आहे.दरम्यान, दुर्गम भागात उपासमारी सोसणाऱ्या सैनिकांसाठी ‘हेल्थ ड्रिंक’ म्हणून १५ वनस्पतींपासून बनवलेला अर्क लवकरच सैन्यदलाला पुरवण्यात येखार आहे. तर डोंगराळ भागात तैनात जवानांना किटकमाश्या चावू नये म्हणून ‘अलोकल’ ही क्रीम डीआरडीओने बनवली आहे. या क्रीमचे ५ लाख डबे नुकतेच लष्कराला पाठविलेत.
१५ मिनिटे चाला, तणावमुक्त राहा
शकतो.
ऑफिसमध्ये चॉकलेट खाण्याची सवयही आपण बदलू शकतो. हे संशोधनाने स्पष्ट झाले आहे. विज्ञानआधारित पत्रिका ‘एपेटाइट’च्या एका अहवालानुसार ते स्पष्ट झाले आहे. एक्सेटर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक एडरियन टेलर यांनी सांगितले, कोर्यालयात काम करताना थकवा जाणवत असताना चॉकलेट खाण्याची सवय लागते. ती काहींना असते. या चॉकलेट
खाण्याच्या सवयीमुळे आपले वजनही वाढते. ते शरिराला धोकादायक आहे.
एक्सेटर विश्वविद्यालयाने याबाबत अभ्यास केला. नियमित चॉकलेट खाणाऱयां ७८ लोकांचा अभ्यास केला. ७८ लोकांचे दोन गट केले. त्यातील एका गटाला १५ मिनिटे चालयला सांगितले. त्यानंतर काही काम करण्यास सांगितले. तर दुसऱ्या गटाला त्यापेक्षा जास्त कठीण काम करण्यास सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या टेबलावर चॉकलेट ठेवली.
संशोधकांनी आणखी दोन गटांना काम करण्यास सांगितले. परंतु काम करण्याच्या आधी त्यांना आराम करण्यास सांगितले. त्यानुसार पहिल्या दोन्ही गटांप्रमाणे दुसऱया गटांनाही काम करण्यास सांगितले. तसेच त्यांच्या टेबलावर चॉकलेट ठेवली. परंतु संशोधकांना लक्षात आले की, व्यायाम केलेल्यांनी दुसऱया दोन्ही गटांपेक्षा चॉकलेट खाल्लीत. त्यांच्या कामावर काहीही परीणाम झाला नाही. त्यामुळे चालने हा व्यायाम किती महत्त्वाचा आहे ते स्पष्ट होते.
डान्स करा, फिटनेस टिकवा
आजची पिढी फिटनेसबद्दल जागरूक झाली असली, तरी नियमितपणे वर्कआऊट करायला त्यांना कामातून वेळ मिळतोच असं नाही. अशा वेळी डान्सची आपली आवड जोपासून फिटनेस टिकवण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. पाटीर्ज, वेगवेगळे शोज किंवा आपली आवड म्हणून अनेक जण डान्स करतात. काही वेळासाठी मनोरंजन करणारा तुमचा हा छंद स्नायू मजबूत करून तुम्हाला ऊर्जा मिळवून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
वेगवेगळ्या प्रकारचा डान्स करण्याच्या सवयीतून स्नायू मजबूत होण्यापासून स्टॅमिना वाढेपर्यंत आणि वजन नियंत्रणात ठेवण्यापासून रक्ताभिसरण सुधारणेपर्यंत अनेक प्रकारचे फायदे होतात. काय आहेत फायदे ते पाहू.
- नियमित व्यायाम केल्याने फ्रेश राहायला मदत होते.
- घामाच्या रुपात शरीरातील उत्सर्जक पदार्थ निघून जात असल्यामुळे त्वचेला चमक येते.
- पचन संस्थेचं काम नीट होतं. हाडं मजबूत होतात.
- या शारीरिक फायद्यांबरोबरच नियमित डान्स करण्यामुळे मानसिक फायदाही होतो. दिवसाची सुरुवात फ्रेश मूडने होते.
- डान्स शिकवताना नवनिमिर्तीचा आनंद मिळतो. ताणतणावाच्या काळात तर हा एक चांगला पर्याय आहे.

आता आपल्याला कोणता डान्स प्रकार निवडायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं उत्तर कोणताही असंच आहे. तुमच्या आवडीचा डान्स करून आनंद मिळवा. फिजिकल, मेण्टल, सोशल, इमोशन आणि स्पिरिच्युअल बॅलन्स राखणं म्हणजे आरोग्य. नृत्य करता तेव्हा शारीरिक व्यायाम, ग्रुपमध्ये डान्स करण्याने सोशल आणि इमोशनल, तुमची आवड जोपासत असल्याने मेण्टल आणि संगीताच्या माध्यमातून स्पिरिच्युअल गरजा पूर्ण होतात.
डान्स शिकण्यामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व खुलून येतं. शिवाय, दररोज दोन तास नृत्य केल्याने तुम्ही दोन वर्षांनी तरुण दिसता. अॅरोबिक अॅक्टिव्हिटी म्हणूनही याचा हृदयाला पर्यायाने शरीराला फायदा होतो. तसेच आता कोणते नृत्य केल्याने आपल्याला काय फायदे होतात, ते आता आपण पाहू या .
- बॉलरुम डान्समुळे लोअर बॅक (पाठीचा खालचा भाग), मांड्या आणि सीटचा व्यायाम होतो.
- फ्लॅमिंको डान्समधील गेसफुल मुव्हमेण्ट्स तुमचा स्टॅमिना तर वाढवतं शिवाय, तुम्हाला अधिक सजग बनवतो.
- टॅप स्टाइलमधील डान्समुळे शरीर मजबूत होऊन शरीराचा समतोल साधणं सुधारतं.
- साल्सा स्टाइलमुळे शरीर जलद हालचाली करतं शिवाय, श्वसन आणि रक्ताभिसरणाला फायदा होतो.
- रक्तदाबाचा त्रास कमी होऊन कोलेस्टोरॉल नियंत्रणात राहतं. शरीर आणि पायांना आकार मिळतो.
- शरीर लवचिक बनतं. पाठीच्या समस्या दूर राखण्यास मदत होते.
- स्त्रियांना बाळंतपणातील समस्या कमी करण्यासाठी नृत्य सहाय्य करते.
नियमित डान्स केल्यामुळे तुमची काडिर्ओव्हॅसक्युलर क्षमता वाढते. याचा फायदा हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी होतो. तुम्ही जर डान्स ग्रुपमध्ये करत असाल, तर सगळ्यांनी मिळून एन्जॉय करण्याच्या या अॅक्टिव्हिटीमुळे आनंद आणि मानसिक समाधान मिळतं. डान्स करताना जिममध्ये व्यायाम करत असल्यासारखा दृष्टिकोन नसल्याने होणाऱ्या फायद्याचं प्रमाण दुणावतं, असं फिटनेस एक्स्पर्ट सांगतात.
धूम्रपानामुळे लवकर येतो मेनोपॉझ!
लंडन- धूम्रपान करणाऱ्या महिलांनो,सावधान!सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.
यासाठी करण्यात येणाऱ्या अभ्यास आधीच्या अभ्यासातले आकडेही जमेस धरले होते. यात अमेरिका, पोलंड, तुर्कस्तान आणि इराणमधील ६००० महिलांचा अभ्यास केला गेला. सिगरेट न ओढणाऱ्या महिलांची मासिक पाळी वयाच्या सरासरी ४६ ते ५१ या वयात थांबते. मात्र दोन शोध सोडले तर, इतर सर्व संशोधनांतून असा निष्कर्ष निघाला की सिगरेट ओढणाऱ्या महिलांमध्ये मात्र ४३ ते ५० या वयात मेनोपॉझ येतो.
या अभ्यासविषयाचे प्रमुख अभ्यासक वाल्दिमीर व्होरनिक म्हणाले,”आमच्या अभ्यासाचे निष्कर्षही हेच शाबित करतात की धूम्रपान केल्याने लवकर मेनोपॉझ येतो.म्हणूनच, महिलांनी धूम्रपान करू नये.
जंक फुड बनवतं नपुंसक
लंडन- बर्गर, फ्रेंच फ्राईज यासारख्या जंक फुडच्या
नावाने तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर, आपल्या मनाला आवर घाला. एका
नव्या संशोधनानुसार अशा प्रकारचं जंक फूड खाणाऱ्या तरुणांमध्ये नपुंसकत्व
येण्याची शक्यता असते.
अमेरिकेतल्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीतल्या आणि आणि स्पेनच्या मर्सिया युनिव्हर्सिटीतल्या अभ्यासकांच्या मते ज्या आहारात ट्रांस फॅट मोठ्या प्रमाणावर असतात, असे पदार्थ तरुणांच्या वीर्यावर परिणाम करतात. डबाबंद पदार्थांमध्ये ट्रांस फॅट मोठ्या प्रमाणावर असतात.
“चौरस आहार खाण्यानेच शरीरात वीर्यवृद्धी होते हे आमच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे” असं या विषयावरचा अभ्यासक ओड्रे गॅसकिंस याने सांगितलंय.
डासांची कॉइल सिगारेटपेक्षा ‘डेंजर’
डासांना मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉइल या सिगारेटपेक्षा जास्त
जीवघेण्या आहेत. आपण सिगारेट पीत नाही, पण घरामध्ये डासांपासून बचाव
करण्याकरता कॉइलचा वापर करत असल्यास त्याच्या धुरापासून आपल्या फुप्फुसांना
इजा पोहचू शकते. नुकताच मलेशियामध्ये या संदर्भात एक अभ्यास करण्यात आला.
वायु प्रदूषणामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम याबाबत जागरूकता होणं
गरजेचं आहे.
कॉइलचा धोका सिगारेट पेक्षा जास्त.
‘केस’ स्टडी
नियमितपणे केसांची काळजी घ्या. घाम केसांच्या मुळांशी जमा होऊन तो
केसांसाठी त्रासदायक ठरतो. हे टाळण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी
केस धुवावेत. (डोक्यावरून नहावे)
डोक्यात होणारा कोंडा ही आणखी एक केसांशी संबंधित समस्या. डोक्यात कोंडा झाल्यामुले केस निर्जीव होवून गळायला लागतात. ही समस्या टाळण्यासाठी आधी केसांनी चापून चोपून तेल लावा. आणि त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने केसांना वाफारा द्या. यामुळे केसांमधला कोंडा निघून जाईल.
वापरलेली चहा पावडर पाण्यात उकळवून घ्या आणि गार झाल्यावर केसांना लावा. आठवड्यातून निदान एकदा तरी हे करा. यामुळे केस मजबूत होतील.डोक्यात होणारा कोंडा ही आणखी एक केसांशी संबंधित समस्या. डोक्यात कोंडा झाल्यामुले केस निर्जीव होवून गळायला लागतात. ही समस्या टाळण्यासाठी आधी केसांनी चापून चोपून तेल लावा. आणि त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने केसांना वाफारा द्या. यामुळे केसांमधला कोंडा निघून जाईल.
तीन चमचे डाळीच्या पिठात दीड ग्लास पाणी घालून त्याचा लेप केसांवर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा. केस वाळल्यावर ते नीट झटकून घ्या. यामुळे केसांमध्ये अडकलेले बेसनाचे कण निघून जातील आणि केस चमकदार दिसायला लागतील.
केस कधीही कडकडीत गरम पाण्याने धुवू नका. तसंच, कधी केस खसाखसा घासून पुसू नका. केस वाळवण्यासाठी खरखरीत टॉवेल न वापरता, मऊ टॉवेल वापरा. डोक्यावर टॉवेल गुंडाळून केसांना अलगद पुसून केस वाळवले पाहिजेत.
या टिप्स वापरुन पहा. याने तुमचे केस मजबूत तर होतीलच, पण, आकर्षक आणि चमकदारही दिसायला लागतील.











No comments:
Post a Comment