14/06/2012


अत्यावश्यक आरोग्‍य टिप्‍स्


जास्त हालचाल करा
तुमच्‍या शरीरास जास्‍त हालचाल होईल असे उपाय करा. तुमच्‍या हातापायांची हालचाल ही नुसती सुदृढतेचं साधन नाही तर, ह्यामुळे ताणसुध्‍दा कमी होतो. सामान्‍य घरगुती कामांपासून ते नियमित व्‍यायाम यांपैकी काहीही करा.
चरबी कमी करा 
तळलेले पदार्थ जसे बटाटावडा, साबुदाणा वडा, पुरी, भजी यांसारखे पदार्थ खाणे कमी करावे. दूध, क्रीम, लोणी, चीज इ. सारखे दुधाचे पदार्थ कमी चरबी प्रकारात परंतु मर्यादित प्रमाणात खावेत.
धूम्रपान सोडा
धूम्रपान सोडल्‍यास तत्‍काळ फरक जाणवतो – तुम्‍हांला जेवणाची चव आणि सुगंध चांगला वाटू लागेल. तुमच्‍या श्‍वासातूनही चांगला वास येईल. कफ नाहीसा होईल. कोणत्‍याही वयोगटातील स्‍त्री-पुरूषांना हे लागू आहे, अगदी वृध्‍दांना देखील. हे सर्व निरोगी लोकांसाठीच नव्‍हे तर धूम्रपानामुळे आधीच काही तरी आजार किंवा विकार असलेल्‍यांसाठी देखील लागू आहे. धूम्रपान सोडल्‍याने फुफ्फुसाचा कर्करोग, इतर प्रकारचेही कर्करोग, ह्रदयविकार, स्‍ट्रोक, फुफ्फुसाचे इतर विकार, आणि श्‍वसनसंबंधी विकारांचा धोका टळतो.
सकारात्‍मक मानसिक दृष्टिकोण बाळगा            
चांगले जीवनमान आणि आरोग्‍यपूर्ण राहणी तसेच जीवनाबद्दल सकारात्‍मक दृष्टिकोण असणे ह्या सर्वांचा परस्‍पर संबंध आहे.
ताण कमी करा
         दर रोज 30 मिनिटे तुमच्‍या आवडीचे कोणतेही काम करण्‍यात घालवा जसे
         बागकाम, एखादे चांगले पुस्‍तक वाचणे, योगाभ्‍यास, फिरायला जाणे, मित्रांना
         भेटणे-बोलणे, संगीत ऐकणे इत्‍यादि, सकारात्‍मक विचारसरणी जीवनाबद्दलचा
         तुमचा दृष्टिकोण सकारात्‍मक करेल.
  प्रदूषणापासून स्‍वत:चे संरक्षण करा
         धुराने भरलेल्‍या खोल्‍या/जागा, वाहनांच्या गर्दीमध्‍ये श्‍वास घेणे टाळा. आपल्‍या
         घराच्‍या आत आणि आसपास पुष्‍कळशी झाडे/रोपे लावा. आणि आपले वाहन
         चांगल्‍या प्रतीचे पेट्रोल आणि देखभाल यांच्‍या मदतीने प्रदूषणमुक्‍त ठेवा.
  जास्‍त पिणे टाळा
    जास्‍त मद्यपान करणे टाळा कारण एक किंवा दोन पेगपेक्षा जास्‍त पिण्‍याने
          मूत्रपिंड विकार आणि कर्करोगासारख्‍या आरोग्‍य समस्‍या उद्भवतील.
  खूप पाणी प्‍या
          पाणी हे आजच्‍या काळातील सर्वांत जास्‍त महत्‍वाचे पोषण आहे. जर तुम्‍ही
          जास्‍त व्‍यायाम करीत असाल किंवा तुम्‍हांला जास्त घाम येत असेल तर
          तुमच्‍या शरीरास जास्‍त पाण्‍याची गरज पडेल. उदाहरणार्थ, 68 किलोग्राम
          वजनाच्‍या एका सामान्‍य व्‍यक्‍तीसाठी 2.2 लीटर (कमीत कमी) पाणी रोज
          पिण्‍याची गरज आहे. कामकरी व्‍यक्‍तीला 3 लीटर (कमीत कमी) किंवा
          जास्‍त देखील पाण्‍याची गरज पडू शकते. नुसतेच निव्‍वळ एक पेला पाणी
          पिणे तुमच्‍यासाठी कितीतरी चांगले ठरेल.
आरोग्‍यमय जीवनासाठी ह्या मूलभूत सूचनांचे अनुकरण करा आणि तुम्‍ही तुमच्‍या जीवनावर नियंत्रण मिळवाल.